आगामी निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती!
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
संघटनात्मक आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन
पिंपरी , दि.९ (लोकमराठी) - आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील आणि भाजपा नंबर- १ होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- १ राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, सूज्ञ मतदारांचे आभारही मानले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक योगेश बाचल, माजी सत्...










