सामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणारा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी – डॉ. सदानंद मोरे
पिंपरी (लोकमराठी) : महाभारतातील दहाव्या अध्यायात सांगितलेल्या विभुतीयोगाव्दारे श्रीकृष्णाने देव-दानवामधील दिव्यत्व अधोरेखित केले आहे. संतांनी देखील 'देव्यत्वाची जेथे प्रचित, तेथे कर माझे जुळती' असा पाठ दिला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणा-या सर्वसामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणाराच आहे. त्यामुळे हा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवड येथे आज व्यक्त केले.
शब्द
पब्लिसीटीच्या वतीने नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळाच्या सहकार्याने देण्यात
येणा-या प्राई़ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे आणि खासदार अमर साबळे
यांच्या हस्ते झाले, त्यावेळी डॉ. मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी
व्यासपीठ...









