ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन
पिंपरी (लोकमराठी न्यूज) : सीमेवरील रक्षण करणारा सैनिक, शेतात राबून देशाची भुक भागणारा शेतकरी यांच्याप्रमाणेच देशांमध्ये ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतू, आपल्या देशामध्ये डायव्हरला मानसन्मान पाहिजे, असा मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गुरु कट्टी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवी बिराजदार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय काजीक, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष म्हस्के, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पोपळे, कोकण विभाग अध्यक्ष अमित दुर्गाई, कोकण जिल्हा अध्यक्ष वासू वालेकर, पुणे शहर अध्यक्ष बबन धिवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल मदने, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शरणू नाटेकर, पिंपरी चिंचवड सचिव गणेश गोफणे, सदस्य हनुमंत काळे, किश...