‘सखी’ केंद्र ठरली लक्षवेधी
पिंपरी (लोक मराठी) : मतदान प्रक्रियेला सोमवारी सकाळी सातपासून सुरुवात झाली. मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. येथे अनेक बूथ तयार केले होते. परंतु, 'सखी बूथ' हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दरम्यान भोसरी सखी केंद्रात सकाळी अकरा पर्यत 11.72, चिंचवड मध्ये 16.5 टक्के तर पिंपरीतील १४१ जणांनी मतदान केले.
शहरात तीन सखी मतदार केंद्र तयार केली होती. या बूथबाहेर फुगे लावले होते. जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेवण्यात आला होता. स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे या शाळेत येणारा प्रत्येक मतदार सखी बूथच्या परिसरात काही क्षण थांबून पुढे जात होता. मतदानासाठी बूथमध्ये जाताना दरवाजातच महिलांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. प्रत्येक महिला 'यंदा काय विशेष?' असे महिला कर्मचाऱ्यास ...