कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, कार्टूनिग, रांगोळी, ऑन द स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन या स्पर्धा घेण्यात आल्या. लिटररी इव्हेंटमध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि वादविवाद या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
डान्समध्ये ट्रायबल डान्स व क्लासिकल डान्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. म्युझिक स्पर्धेमध्ये क्लासिकल, सोलो, इंडियन ग्रुप सॉंग, वेस्टर्न ग्रुप सॉंग, सोलो डान्स अशा अनेक डान्स प्रकारांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. थिएटर कॉम्पिटिशनमध्ये वन ऍक्ट प्ले, स्किट, माईम, मिमिक्री अशा एकूण 25 स्पर्धांचे आयोजन कॉलेजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धाचा उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उ...










