कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, कार्टूनिग, रांगोळी, ऑन द स्पॉट फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन या स्पर्धा घेण्यात आल्या. लिटररी इव्हेंटमध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि वादविवाद या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

डान्समध्ये ट्रायबल डान्स व क्लासिकल डान्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. म्युझिक स्पर्धेमध्ये क्लासिकल, सोलो, इंडियन ग्रुप सॉंग, वेस्टर्न ग्रुप सॉंग, सोलो डान्स अशा अनेक डान्स प्रकारांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. थिएटर कॉम्पिटिशनमध्ये वन ऍक्ट प्ले, स्किट, माईम, मिमिक्री अशा एकूण 25 स्पर्धांचे आयोजन कॉलेजमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धाचा उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे होते . त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कलेचा, क्रीडेचा राजहंस दडलेला असतो. त्याला संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, जुनिअर विभागाचे प्रमुख प्रा.तृप्ती हंबीर, प्रा. गणेश जाधव यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

कर्मवीर जयंतीनिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

डॉ. हेमलता कारकर, डॉ.विश्वास देशमुख, डॉ.रंजना जाधव, डॉ.नम्रता मेस्त्री, यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.