मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक
पिंपरी : एका दुकानदाराकडे २५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांना विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एकुण सात जणांना वाकड पोलीसांनी अटक केली आहे.
हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. राव कॉलनी, प्लॉट नं. , रो. हाऊस नं. ०५, भंडारी हॉस्पिटल जवळ, तळेगाव दाभाडे, मुळगावराजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रामनगर राहटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.१०) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी सतीश केदारी आणि त्याचे अन्य सहकारी चौधरी यांच्या दुकानात आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण ...