पुणे

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 
पुणे, सामाजिक

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरीतील जिजामाता रूग्णालयासोबत आयोजन केलेल्या या शिबिरात सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिजाऊ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साबळे, डॉ. गणेश तागडे व डॉ. स्नेहा जगदाळे, फार्मासिस्ट दूधमल जाधव, लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच आशा वर्कर, हाॅस्पीटल कर्मचारी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराचा ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला...
“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे
पुणे, शैक्षणिक

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे

हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉलेजमध्य...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, ता. २६ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक, दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी एस .टी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली....
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन 'ईवेस्ट कचऱ्याची समस्या' या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी द...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 'सर्जनशीलतेची अभिव्यक्ती' ही थीम घेऊन महाविद्यालयीन पातळीवर आविष्कार संशोधन प्रकल्पस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आविष्कार स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. विकास मठे व प्रोफेसर डॉ. श्रीकृष्ण सरताळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड उपस्थित होते. प्रोफेसर डॉ. विकास मठे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात एक शास्त्रज्ञ लपलेलाअसतो. नाविन्याचा ध्यास घेऊन महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेल्या या उपक्रमात आपणच आपल्याला सिद्ध केले पाहिजे. प्रोफेसर डॉ. श्रीकृष्ण सरताळे म्हणाले की, निरीक्षण, सातत्य आणि अभ्यास यातून आपण संशोधनात आपले चांगले...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : स्वतःची ब्युटी सलून, स्पा थेरपी अँड मॅनेजमेंट, ब्युटी कौन्सेलर, मेकअप आर्टिस्ट, मेकअप ट्रेनर, हेअर ड्रेसर, हेअर डिझायनर, न्यूट्रिशन डायजेशन कन्सल्टंट, फिटनेस ट्रेनर अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ब्युटी आणि वेलनेस पदवीस्तरीय कोर्स करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम करून आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलांबरी थोरात यांनी बी.होक. विभाग आयोजित एक दिवसीय ब्युटी अँड वेलनेस च्या सेमिनारमध्ये व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कौशल्यपूर्ण कोर्स करून जीवनात यशस्वी व्हा. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांना पदवीबरोबर कौशल्याचे धडे या कॉलेजमध्ये दिले जातात. आपल्या भावी जीवनासाठी कौशल्यपूर्ण शिक्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे महत्त्व सांगितले. तसेच तरुण पिढीला व्यवसाय करायचा असेल तर कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयाचे ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना जाधव यांनी तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार यांनी केले. कार्यक्...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले....
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....
कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार
पुणे, शैक्षणिक

कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सत्कार

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कवी डॉ. संतोष पवार व डॉ. उमेश शिरसट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. कवी डॉ. संतोष पवार यांच्या 'नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल' या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. उमेश शिरसट यांना २०१९ या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठ...