यशोगाथा

प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘प्रविण प्रशिक्षक’पदी नियुक्ती
यशोगाथा

प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘प्रविण प्रशिक्षक’पदी नियुक्ती

अहमदनगर, ता. २३ : ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ' प्रविण प्रशिक्षक ' (Master trainer) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शाश्वत विकास संकल्पना अंतर्गत केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाकडून राज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटी करणासाठी त्यांच्याकडे कार्यभार असणार आहे. राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे या शासनाच्या संस्थेत त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. निवेदक, सूत्रसंचालक व व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध असलेले प्रा. राजेंद्र गायकवाड हे अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा सर्वांनाच विशेष फायदा होईल. अशी जनसामान्यांकडून भावना व्यक्त करण्यात येत आहे....
तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; आरती गवारे राज्यात दुसर्‍या क्रमांकाने ‘एलआयसी विकास अधिकारी
यशोगाथा

तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; आरती गवारे राज्यात दुसर्‍या क्रमांकाने ‘एलआयसी विकास अधिकारी

निगडी येथील ओझर्डे'ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन पिंपरी (लोकमराठी न्यूज) : काही जण सर्व काही अनुकूल असतानाही उगाच तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काही जण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा कोणताही बागुलबुवा न करता सर्व अडचणींवर मात करतात. खेड तालुक्यातील मोई येथील शेतकरी कुटुंबातील आरती गवारे नं परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार न करता तळवडे येथील आयटी कंपनी मध्ये नाईट शिफ्ट मध्ये नोकरी करत आपल्या मेहनतीच्या जोरावर एलआयसी विकास अधिकारी परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात दूसरी येत घवघवीत यश संपादन केलं आहे. तेवीसाव्या वर्षी लेकीनं मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने वडिल संतोष गवारे आणि आई उषा गवारे यांना आकाश ठेंगणं झालं आहे. तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात ‘ एलआयसी विकास अधिकारी म्हणून नववा क्रमांक पटकवला आहे. आरतीचं हे यश अनेकांसाठी प्रेरण...
भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी
यशोगाथा

भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी

पोलीस उपनिरीक्षक बनून नीलेश बचुटेने फेडले कष्टकरी मायबापाचे ऋण पिंपरी : पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्वं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, वडिल गवंडी, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी गवंडी काम करत चार पैसेगाठीला बांधून नीलेशला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर नीलेशनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या 4 जुलैच्या निकालात उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सर्व नातेवाईक गहिवरून गेले. काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे नीलेशने सिध्द करून दाखविले आहे. क...
प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान
यशोगाथा, शैक्षणिक

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान

हडपसर : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ची पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ''अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई'' या विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले....