- तब्बल २०१ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान
- अनेकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ
काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर, व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) साई मल्हार मेडिकल शेजारी करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच लहान मुलांचे डॉक्टर महाले यांच्या क्लिनिकचे उद्घाटन मा. विरोधी पक्षनेते व विदयमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. महाले, राजाराम तापकीर, मल्हारीशेठ तापकीर, स्विकृत सदस्य विनोद तापकीर, हरेश तापकीर, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या अश्विनी चंद्रकांत तापकीर, ‘ग’ प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, विलास पाडाळे, मा. नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, नरेश खुळे, नवीन तापकीर, सरपंच गोविंद वलेकर, युवा नेते अनिल नखाते, हरेश नखाते, संभाजी नढे, कैलास सानप, संजय गायके, पद्माकर जांभळे, महेंद्र बामगुडे, राजूशेठ पवार, अनिल पानसरे आदी उपस्थित होते.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ई.सी.जी, रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तदाब तपासणी, व बॉडी मास इंडेक्स यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक नागरिकांनी सदर तपासणीचा लाभ घेतला.
सामाजिक बांधिलकीतुन चंद्रकांत तापकीर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी तब्बल दोनशे एक विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन झाले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिराचे आयोजक व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, नवनाथ तापकीर, ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर, रुपेश तापकीर, साई मल्हार सोशल फाउंडेशनचे विवेक तापकीर यांनी उपस्थित मान्यवर रक्तदाते व नागरिक यांचे आभार मानले. नागरिकांनी सदर शिबिर भरवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.