पिंपरी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते, डॉ. स्वप्नील देवकाते आदी मान्यवराच्या उपस्थितीत ध्वजारोहन मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध लेखन स्पर्धा घेतली. इयत्ता पहिली ते पाचवी या गटाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये श्रवण डिगे या विध्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. इयत्ता सहावी ते आठवी या गटाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये रिद्धी सातपुते या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आला. इयत्ता नववी ते दहावी या गटाच्या निबंध स्पर्धेमध्ये शिवानी धनवटे या विद्यार्थीनीचा प्रथम क्रमांक आला. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करणारे व्हिडीओ तयार केले. कोरोना महामारीमुळे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नव्हते, तरी घरी बसून विद्यार्थी झूम मिटींगच्या माध्यमातून ऑनलाईन सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री भुजबळ यांनी केले. रोहिदास धिंदळे यांनी आभार मानले. शेवटी पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.