चिंचवड : श्री जैन विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गुरु गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षपद अॅड. राजेंद्र कुमार मुथा यांनी भुषविले. तसेच सहाय्यक सेक्रेटरी व शाळा समितीचे अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या स्वागतानंतर सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अॅड राजेंद्र कुमार मुथा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत व राष्ट्रगीताने ध्वजास मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनिता नवले यांनी प्रास्ताविक केले. त्यानी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रौढ मैदानी स्पर्धेतील विजेते विद्यालयातील क्रीडा शिक्षक वाघमारे भगवान आणि नाडे सचिन यांचा रौप्य पदक व कास्यपदक देऊन सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आणि पाचवी ते आठवी या वर्गांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता नववी विद्यार्थ्यांसाठी सॅलेड डेकोरेशन स्पर्धा आयोजन करण्यात आले.
त्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल गुंजाळ, श्री गुरु गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट प्रमुख गायकवाड, सतीश भारती, पर्यवेक्षक देवकाते एस.जी., विभागप्रमुख शिरसाट एस व्ही. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. जी. नाईक यांनी केले तर, उपमुख्याध्यापिका मनिषा जैन यांनी आभार मानले.