
पिंपरी चिंचवड : मानवासह पशु-पक्षांचा जीव घेणाऱ्या चिनी मांजावर बंदी असताना शहरात मांजाची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पोलिस व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग गाड झोपेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे मानवासह पक्षांचेही जीव जात असल्याने न्यायालयाने मांजावर बंदी घातली. परंतु बंदी झुगारून मांजाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक जखमी होत असून अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. शहराच्या विविध भागात असा मांजा मिळत असून मुलांकडून त्याची खरेदी केली जाते.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे
दरम्यान, काही दिवसांपुर्वी पिंपरीतील साई चौकातून मुंबई-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चिनी मांजाने भरलेला रिळ मुलांकडून हस्तगत केला. मांजा कुठे मिळतो, याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र, मांजा पुन्हा मुलांकडे देऊन टाकला. पोलिसच अशा पद्धतीने बेजबाबदार वागत असतील, तर कायद्याची अंमलबजावणी कोण करणार. असा प्रश्न सतावल्याशिवाय राहणार नाही.
या घटनेतून तरी बोध घ्यावा
नाशिक फाट्यावरील उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जाणाऱ्या डॉ. कृपाली निकम (वय 26) या तरुणीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना 7 ऑक्टोबर 2018 घडली आहे. त्यावेळी पोलिस प्रशासनाने मोठी धावपळ करत आरोपींचा शोध घेतला मात्र, शेवटी काहीत हाती आले नाही. या घटनेनंतर पोलिस व महापालिका प्रशासनाने कोणताच बोध घेतला नाही. अशा अनेक घटना घडल्या असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
