चिंचवडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

चिंचवड, (लोकमराठी) : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर तसेच डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पिंपरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड-शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ विरंगुळा केंद्रात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी समरणशक्ती, एकाग्रता वाढवणे, जेष्ठ नागरिकांसाठी मधुमेह, संधिवात, मणक्याचे आजार, लहान मुलासाठी ऍलर्जी, सर्दी, स्त्रियांसाठी मासिकपाळीच्या तक्रारी, त्वचेचे विकार केस गळणे, पांढरे होणे, चेहऱ्यावरचे डाग, पोटाचे विकार अपचन, कावीळ, मुतखडा, पोटदुखी, कान, नाक, घसा, इत्यादी यावरती तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. डी. बी. शर्मा, डॉ. पार्थ अफाले, डॉ. रागिणी कुलकर्णी, प्रा. हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, प्रकाश शिंदे, अशोक सूर्यवंशी, निखिल गायकवाड यांनी सहकार्य केले.