मुंबई : जागतिक वेटलँड दिनानिमित्त ‘देव हा त्याने बनवलेल्या निसर्गातच आहे, व ते राखलेच पाहिजे’ या आदर्शाने वनशक्ती, वन विभाग व पालिका अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील पाणथळ भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच संपूर्ण भाग स्वच्छ करून वॉटर बर्ड पक्ष्याचे वास्तव्य वाढवणे हेच यावेळी उद्दिष्ट ठेवणेत आले.
या स्वच्छता मोहीमेत वनाधिकारी श्री. वरक, एफ वॉर्डचे घनकचरा अधिकारी, वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कोरगावकर, नितीन चव्हाण, शिवनारायण शर्मा, सोनिका शर्मा, स्वराज मंच, बीव्हिबीजेए यांच्यासह विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.