
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत, त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिचवड तर्फे रविवारी (दि ५) मावळ किल्ले तुंगगड येथे गडसंवर्धन मोहीम राबवणयात आली.
सर्वप्रथम गडावरील ध्वज बदलण्यात आला. शिववंदना घेऊन प्रवेशद्वार, पायऱ्या, तसेच जे अवशेष गवता खाली गेले होते, ते साफ करण्यात आले. गडावरील सर्व कचरा गडाच्या खाली कचरा कुंडीत आणुन टाकण्यात आला.
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे
यावेळी ग्रुपचे संस्थापक अक्षय नाळे, सुशील पोतदार, अतुल महाडिक, सुरज करांडे, शुभम देशमुख, परमेश्वर त्रिमले, शिवम खिल्लारी, ओमकार जाधव, सागर मोरे, अमित मालुसरे, श्री मरगळ, कैलास सोनटक्के, राहुल ईबितदार, अतिश अगरक, कैलास चाकोरे, रुपेश पाटसकर, दिपक खंडगावे आदी ४० स्वयंसेवकांनी मोहिमेत सहभाग घेतला.