सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्यात अखेरचा खल सुरु झाला असून जोरदार संघर्षाला सुरुवात झाली आहे. सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघ अनेकवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना अर्ज भरण्याची मुदत सुरु होऊनही त्यांना अजून उमेदवार घोषित करता आलेला नाही. त्याउलट भाजपने गिरीश बापट यांचे नाव घोषित करून प्रचाराला सुरुवातही केली आहे. आता जाहीर होणाऱ्या उमेदवाराला फक्त १५ ते १६ दिवस प्रचाराला उपलब्ध असताना पक्षाने केलेली दिरंगाई परवडणारी नाही. त्यातच पुण्यातून लढण्यासाठी एक उमेवाराची निवड केल्याचे संदेश फिरण्यास सुरुवात झाली. संबंधीत उमेदवाराने सत्कार स्वीकारल्याचेही फोटोही फिरत होते. मात्र एका इच्छूक माजी लोकप्रतिनिधीने याबाबत अत्यंत नाराजी व्यक्त केल्यामुळे नेतृत्वाला दखल घ्यावी लागली आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एका नावावर ठाम असतानाही त्या माजी पदाधिकाऱ्याच्या हट्टामुळे पुन्हा एकदा खल सुरु झाला आहे. आता तर निवड करणे अत्यावश्यक आल्यामुळे येत्या काही तासात उमेदवाराची निवड होणार आहे.