परतीच्या पावसामुळे खडकी सदार येथे सोयाबीन पिकाचे नुकसान |शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी

रिसोड प्रतिनिधी शंकर सदार: मागील चार पाच दिवसापासून वाशिम जिल्हात मुळसधार पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास घिरावून गेला आहे. रिसोड तालुक्यातील खडकी सदार या गावातील शेतकऱ्याची सोयाबीनची कापणी केली आहे. सतत तीन चार दिवस चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे दाणे फुटून पूर्ण सोयाबीन पीक वाया गेले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

परतीच्या पावसामुळे खडकी सदार येथे सोयाबीन पिकाचे नुकसान |शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले होते. त्यात आता सोयाबीन काढणीला आले असताना पावसामुळे झाडाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत तर कपाशीची बोंडे सुद्धा काळवंडून गेली आहेत. तसेच तूर, मूग, उडीद या पिकांनाही फटका बसला होता. यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. अशातच काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीनचे पिकामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. आता सोयाबीन पीक काढणीला आले आहे. मात्र, परतीचा पाऊस नुकसान करणारा ठरत आहे. आधीच सोयाबीनला उतारा नाही. त्यात पीक मातीमोल होत आहे. या परतीच्या पावसाने रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकऱ्याचे शेतातील सोयाबीन पीक उध्वस्त झाले आहे.

परतीच्या पावसामुळे खडकी सदार येथे सोयाबीन पिकाचे नुकसान |शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी

दरम्यान, कृषी व महसूल विभागाने ऑगस्ट महिन्यात आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे केले नाही. त्यामुळे आतातरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून निदान दिलासा ध्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Actions

Selected media actions