रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा

रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा

पिंपरी, ता १२ : रावेत येथील महापालिका जलउपसा केंद्राजवळ गेल्या काही महीन्यांपासून नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकण्याचे प्रकारे अनोळखी व्यक्तींकडून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थेरगाव सोशल फाऊंडेशनने दिला आहे.

याबाबत फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पवना नदीपात्रातून रोज करोडो लिटर पाणीउपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले असून त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, गेल्या काही महीन्यांपासून या ऊपसाकेंद्राजवळ नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकण्याचे काम अनोळखी समाजकंटकांकडुन केले जात आहे. हा धक्कादायक प्रकार थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या निदर्शनास आला असून ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यासाठी आम्ही गेल्या २ महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत.

यामुळे पाण्यामध्ये जर काही विध्वंसक घटकांचा समावेश झाला तर संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हि अतिसंवेदनशील बाब असल्याने आपण त्वरित या नदीपात्राच्या दोन्ही बाजून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हा परिसर आपल्या निगराणीत ठेवावा, जेणेकरून त्याठिकाणावरून पाण्यामध्ये काही अनुचित व विध्वंसक घटक मिसळण्याचे काम कोणाकडून होता काम नये. असे निवेदनात नमूद केले आहे.

रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा

दरम्यान, अजुनही महापालिकेकडुन यावर कोणतीच दखल घेण्यात येत नाहीये. त्यामुळे महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग व पर्यावरण विभागाला थेरगाव फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी राहुल सरवदे, अनिकेत प्रभु, प्रकाश गायकवाड, गणेश डांगे आदी उपस्थित होते.