रहाटणीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन

रहाटणीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन

पिंपरी, ता. १२ मार्च : रहाटणी प्रभाग क्र. २८ येथे प्राधिकरण व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ज्येष्ठासाठी विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व राज्य लोकसेवा आणि केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी माजी स्वीकृत नगरसदस्य सागर खंडूशेठ कोकणे, ड क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी विलास देसले, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनिलदत्त नरोटे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल शिर्के, विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. ही अभ्यासिका पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. भविष्यातील राज्य व केंद्रातील अधिकारी या अभ्यासिकेतून यशस्वी होतील असा विश्वास नगरसेवक नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.