राजे शिवाजी नगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

राजे शिवाजी नगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेश सचिव दत्तात्रय कोंडीबा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राधिकरण, राजेशिवाजीनगर (पेठ क्र.16) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दत्त साई मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, शुगर आदी तपासणी व औषधोपचार करण्यात आले.

या शिबिराचा लाभ घरकुल, नेवाळे वस्ती, राजे शिवाजी नगर चिखली प्राधिकरण मधील नागरिकांनी लाभ घेतला. त्यानंतर दत्तात्रेय जगताप यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील गोर-गरीब, विधवा, परित्यक्ता आणि गरजु लोकांना किराणा किटचे वाटप केले. या शिबिराला माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रमुख विजय लोखंडे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

या प्रसंगी दत्तात्रय जगताप यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरामुळे आणि गोरगरिबांना केलेल्या धान्य वाटप यामुळे त्यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले, मानले आणि वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी काशिनाथ जगताप, नाना बालघरे, चांगदेव बालघरे, विनोद विधाते, गणेश आंबेकर, तुषार भागवत, विश्वनाथ पवार आदी उपस्थित होते.