रहाटणीत सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचा उत्साहात शुभारंभ; व्यावसायिक संकल्पासोबत मनोज कुमार बोरसे यांनी केला सामाजिक जबाबदारीचा निश्चय

रहाटणीत सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचा उत्साहात शुभारंभ; व्यावसायिक संकल्पासोबत मनोज कुमार बोरसे यांनी केला सामाजिक जबाबदारीचा निश्चय

रहाटणी : सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचे उद्घाटन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व ब्राईट डेंटल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अभिजित देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना व व्यावसायिकांना विविध नागरी सेवा एकाच छताखाली मिळणार आहे. यामध्ये भारतातल्या विविध विमा कंपन्यांचे विमा उत्पादने जसे जीवन विमा, वाहन विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा इत्यादी सर्व प्रकारच्या विमा सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. सिटीजन फर्स्टचे वैशिष्ट्य आहे की, नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व क्षमतेनुसार विमा घेण्याचा पर्याय सिटीजन फर्स्ट सेवा केंद्र उपलब्ध करून देणार आहे.

या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात विमा सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीस दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत लवकरच आपले सरकार सेवा केंद्र तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नागरी सुविधा केंद्र प्रस्तावित आहे. सर्व सेवा नागरिकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी मोबाईल ॲप निर्माण करण्याचा मानस मनोज बोरसे यांनी व्यक्त केला.

सिटीझन फर्स्ट अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना मोठे करण्यासाठी डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी स्थापन केलेल्या बडा बिझनेस कंपनी अंतर्गत व्यावसायिक बांधवांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी अधिकृत सल्लागार म्हणून सौ. रुशाली बोरसे यांना डॉ. विवेक बिंद्रा यांच्या कंपनीने नियुक्त केले आहे. डॉ. विवेक बिंद्रा हे जे आशियातील प्रथम क्रमांकाचे व्यवसाय मार्गदर्शक आहेत तसेच डॉक्टर विवेक बिंद्रा यांचा यूट्यूब चैनल जगातील क्रमांक एकचा व्यवसाय मार्गदर्शन करणारा युट्युब चॅनेल आहे देशातील व्यावसायिक प्रशिक्षित झाल्यास करोडो कुटुंब आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होते, असे श्री मनोज बोरसे म्हणाले.

सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच कुटुंब सुरक्षा अभियान राबविले जाणार असून कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण देऊन त्यांच्या भविष्याचे नियोजन, निवृत्तीचे नियोजन, मुलांचे संगोपन व सुरक्षा, मुलांचे शिक्षण व विवाहासाठीचे नियोजन, कर नियोजन, वाहनांची सुरक्षा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे, सोबतच सदर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आवश्यक कागदपत्रे पडताळून ते दुरुस्त करण्यासाठी प्रत्यक्ष मदत सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे.

सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यांमध्ये एक करोड टर्न ओव्हरचे लक्ष्य साध्य करण्याचा संकल्प करण्यात आला, याशिवाय सदर व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा मोठा हिस्सा दिव्यांग बांधवांसाठी, बेवारस मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी तसेच युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे यासाठी रक्कम रुपये पाच लाख दान करण्याचा मानस मनोज कुमार बोरसे यांनी व्यक्त केला. सदर संकल्पपूर्तीसाठी सर्व उपस्थित मान्यवर, हितचिंतक नागरिक, मित्रमंडळी यांना सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचा आव्हान मनोज बोरसे यांनी केले.

अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रमातून सदर कार्याची सुरुवात झाली असून ब्राइट डेन्टल फौंडेशन व सप्तर्षी फौंडेशनच्या वतीने विशेष (दिव्यांग) मुलांसाठी मोफत दांतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. ब्राइट डेन्टल फौंडेशनचे संस्थापक डॉ. अभिजीत देशपांडे यांनी यापुढेही असेच सामाजिक उपक्रम श्री बोरसे यांच्या सहयोगाने चालू ठेवण्याचा संकल्प केला.

सदर व्यावसायिक कार्य आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे सुरू होत असून कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक जबाबदारीचा समन्वय साधण्यासाठी सदर व्यावसायिक संकल्पाची बांधणी करण्यात येत असल्याची भावना मनोजकुमार साहेबराव बोरसे यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमास नगरसेविका सविता खुळे, उन्नती फाउंडेशनच्या संस्थापिका कुंदा भिसे, स्वराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुंजीर, सीए अरविंद भोसले, बाळासाहेब काटे, अर्जुन काटे, शिल्पा चव्हाण, वरून सावरे, प्रितेश लाड, उद्योजक विशाल मासुळकर, प्राध्यापक रणदिवे, विजय मुनेश्वर, आहारतज्ञ कोमल बोरसे, डॉ. रजत मालोकार, डॉ. निलेश आकोलकर, डॉक्टर राजीव देसाई, डॉ. हेमंत चव्हाण, किरण जाधव, अ‍ॅड. निगडे, संतोष मेहेत्रे, दिनेश बच्छाव, गणेश नखाते, निसार मुलानी, योगेश पेटकर, महेश सावर्डेकर, निलेश जागीरदार, किरण गवारे, श्री गवस, श्री धारणकर, अविनाश चव्हाण, श्री सुगवेकर, सूर्यकांत काळे, श्री सुरोशे, उमेश देसाई, सचिन सोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.