चिंचवड : दळवीनगर आणि भोईरनगर येथील रस्त्यावर कायम वर्दळ असते. भोसरी आणि हिंजवडी येथे आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्त्यावर कायम गर्दी असते. मात्र, गेली १५ वर्षापासून या ठिकाणी बसथांबा नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हापावसात रस्त्यावर जीव मुठीत घेऊन थांबावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधारचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी केली आहे.
याबाबत माधव धनवे पाटील यांनी लोकमराठी न्यूजला माहिती देताना सांगितले की, निगडीच्या दिशेने जाणाऱ्या बसला गेले १५ वर्षे बस स्टॉपच नाही. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी उन्हातान्हात, पावसात बसची वाट पाहत असतात. त्यात येथील रस्ता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असल्याने आणि रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहने भरधाव असतात. त्यामुळे बसची वाट पाहत रस्त्यावर उभे असणाऱ्यांना अपघात होण्याचा धोका उद्भवतो.
यासाठी राष्ट्रवादी पदवीधारचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी थेट पुणे महानगर परिवहन मर्यादित महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी मिश्रा यांनी आश्वासन देत लवकरात लवकर बस थांबा उभारण्यात येईल असे सांगितले. प्रभाग १७ आणि प्रभाग १९ मध्ये हा रस्ता येत असल्याने येथील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. असे माधव पाटील म्हणाले.