मुंबई (लोकमराठी) : आज सकाळी राज्यात मोठा भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न मावळले आहे.
दरम्यान, आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी आपले व्टिटर आकाऊंटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लिहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.