श्री फाउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्यातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप

श्री फाउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्यातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र, या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी. यानिमित्त श्री फॉउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरस्ते, वंचित निराधार लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

ज्या समाजात आपण राहतो, वावरतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. या उद्देशाने रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपणारे व घर करून रहाणाऱ्या वंचिताच्या घरात दिवाळी साजरी व्हावी, म्हणून त्या लोकांना दिवाळी फराळचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. चिंचवडगाव, जकातनाका, एसकेएफ रोड, आकुर्डी खंडोबा माळ चौक, निगडी उड्डाणपुल याठिकाणी जाऊन १६० पाकीट फराळ वितरित करण्यात आले.

श्री फाउंडेशन आणि श्री वेदिका महिला बचत गट यांच्यातर्फे वंचितांना दिवाळी फराळ वाटप

या प्रसंगी श्री फॉउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुशांत पांडे, सल्लागार संदीप शिंदे, गणेश बारणे, संतोष बोरले, मदन जोशी, प्रशांत जाधव, तसेच श्री वेदिका महिला बचत गटाच्या अध्यक्षा सरिता पांडे आदी उपस्थित होते.


Actions

Selected media actions