पिंपरी : दिवाळी म्हणजे अंधकार नष्ट करत प्रकाशमय वातावरण निर्माण करणारा सण. या सणात प्रत्येक जण जीवनातील दु:ख दुर करून आनंदाचा अनुभव घेत असतो. याच अनुषंगाने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने बावधनमधील अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुला-मुलींचे अनाथाश्रमात दिवाळी साजरी केली. तेथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत फाउंडेशनने त्यांना मिठाई, कपडे व आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
त्याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, अतुल पाटील, अनिकेत सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कल्पना वरपे, आनंद हास्य क्लबचे प्रमुख सेवक राजेंद्र जयस्वाल, निर्मला कासार, विमल पुजारी, सुनिता जयस्वाल, शोभा देवरे, राजमनी पुजारी, जयश्री भोसले, संजय डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी मुलांकडून हास्य योग करून घेत, त्यांच्या मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न हास्य क्लबच्या माध्यमातून करण्यात आला. त्याला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देता, या क्षणांचा आनंद घेतला.
दरम्यान, प्रत्येक वर्षी उन्नती फाउंडेशनच्या वतीने दिवाळी वंचितांच्या सानिध्यात साजरी केली जाते. मागील वर्षी उन्नती फाउंडेशनने वृद्धाश्रमात साजरी करत वृद्धांचा आनंद द्विगुणित केला होता.
उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, दिपावली कुटूंब व नातेवाईकांबरोबर प्रत्येक जण साजरी करतात. मात्र, जे आपल्यातीलच असून अनाथ, मतिमंद आहेत, त्यांना या सणाच्या निमित्ताने आनंदीत व समाधानी ठेवले पाहिजे. या सामाजिक जाणीवेतून उन्नती फाउंडेशनने आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले.”
मनोजकुमार बोरसे म्हणाले की,” उन्नती सोशल फाउंडेशनचे कार्य खरोखरच खुप कौतुकास्पद आहे. सतत काहीना काही योगदान, उपक्रम करणारे उन्नती फाउंडेशन तळागाळात पोहचले आहे. या मुलांना मदत करून उन्नतीने समाजिक जाणिव जागृत केली आहे.”
दुचाकी चोरी जाण्यापासून वाचवा