यशवंत कण्हेरे
विसरु नकोस ताई तू । त्या जिजाऊ मातेला ।।
जिने छत्रपती शिवाजी राजा निर्माण केला ।।
विसरू नकोस ताई तू । त्या सावित्रीबाई फुलेंना ।।
जिने स्त्री शिक्षण स्वातंत्र्याचा लढा येथे दिला ।।
विसरू नकोस ताई तू । इंदिराजी गांधींना ।।
जीने आपला देशाचा दरारा जगावर निर्माण केला ।।
विसरू नको ताई तू । त्या माता सिंधुताई सपकाळंना।।
जीने जगन्मातेचा सन्मान येथे मिळविला ।।
ताई तू माया आहेस, छाया आहेस । आहेस तू जगनिर्माती ।।
जागतिक दिनानिमित्त नव्हे तर । नित्य आदर करतो तुझ्या प्रति।।