डॉ. किरण मोहिते
नातवंड म्हणजे दुधाची साय. पोटाच्या गोळ्या पेक्षाही नातवावर प्रेम, आपुलकी, माया असणारे. त्या माया पोटे ताड ताड बोलणारे देखील असे माझे आजोबा गावावरून पुण्यात यायचे. सातारा वरून पुण्यात येताना थेट रेल्वेने प्रवास करून चक्क देहु रोड पर्यंत लोकलने एकटे प्रवास करायचे. मंदिरात जाण येणं चालू असेयाचं. किर्तन, भजन, तोंड पाठ, पेटी घेयाचे अन भजन गात बसेयचे. वय साधारण पणे ८६ वर्ष. या वयात तरुणांना देखील लाजवेल असं चालणं, बोलण, स्मरणशक्ती, एका डोळ्याने अंधुकसं दिसायचं एवढंच.
मी म्हटलो दादा एखाद भजन म्हणा मी डायरीत लिहून ठेवतो. त्यांनी स्वयं लिखित तयार केललं कडव…
संगती करावी सदा सज्जनाची
सावली नसावी कधी दुर्जनाची ( 1 )
कुण्या दुर्बलता नको जोर दाउ
नको माणसा तू गुन्हेगार होवो
लज्ज धरावी जनाची मनाची
संगती करावी सदा सज्जनाची
सावली नसावी कधी दुर्जनाची ( 2 )
निथळ होई पाणी आधीचे गढूळ
फेकसी जगाच्या डोळ्यात धूळ
आठवण होईल मानवाची
संगती करावी सदा सज्जनाची
सावली नसावी कधी दुर्जनाची ( 3 )
विधाता त्याला पडे मुका मार
लागेल परंतु नाही दिसणार
संगती करावी सदा सज्जनाची
सावली नसावी कधी दुर्जनाची ( 4 )
जगामध्ये असावे बंधू प्रेमभाव
पाठीमागे राहील भास्कर नाव
होळी होईल पापी वासनाची
संगती करावी सदा सज्जनाची
सावली नसावी कधी दुर्जनाची ( 5 )