‘एक दिवस सुखाचा’ जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम

'एक दिवस सुखाचा' जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम
  • नगरसेविका उषामाई काळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे व कांचन मुव्हीज यांच्यातर्फे केले होते आयोजन

काळेवाडी : नगरसेविका उषामाई काळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे, कांचन मुव्हीज परिवार पुणे व अल-हम्द एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्हफेअर सोसायटी खारघर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदू लॉन्स येथे “एक दिवस सुखाचा” हा जेष्ठ नागरिकांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम शनिवारी (ता. २) पार पडला. या कार्यक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून आनंद घेतला.

नगरसेवक संतोष कोकणे, माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, सज्जी वर्की, गोरख कोकणे, संगिता कोकणे, संजय नरळकर, नाथा काळे, सामाजिक कार्यकर्ते अजीमोघीन बक्य, अल-हम्द एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी खारघर मुंबईचे मेहबुब कासार, स्वरनूपुर इन्स्टिटयूट ऑफ डान्स अँड मुसिकच्या राजेश्वरी गुरव, देवमाणूस फेम अभिनेता अंकुश मांडेकर व देवमाणूस फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी, किशोर वाघ, दिग्दर्शक संदीप कर्नावट, सिने अभिनेता प्रशांत तपस्वी, सिने अभिनेता काळुराम ढोबळे, गायक हेमंत दंडवते यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ काळेवाडी, सोनिगरा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

'एक दिवस सुखाचा' जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम

यावेळी वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, माजी विक्रीकर उपायुक्त रमेश चक्रे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर, योग गुरू व माजी विक्रीकर उपायुक्त सुरेश विटकर, जेष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन, संगीतकार व समाजिक कार्यकर्ते सुधिर दारव्हेकर तसेच काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार पद्माकर जांभळे आणि कांचन मुव्हीजचे प्रविण घरडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उषामाई ढोरे व लायन्स क्लब अध्यक्ष व व्याख्याते वसंत कुमार गुजर यांची विशेष हजरी होती.

'एक दिवस सुखाचा' जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम

महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गणेश वंदना व भरतनाट्यम याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. भावगीते, अभंग, जुनी सदाबहार गाणी व नृत्य आविष्काराने ज्येष्ठांची मने प्रफुल्लित झाली. फिरोज मुजावर यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंतच्या या कार्यक्रमात नाष्टा, जेवण व चहाची सुविधा करण्यात आली होती.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ज्येष्ठांनी घराबाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक वेगळ्याच मानसिक अवस्थेत होते. त्यांचा विरंगुळा व मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या, गप्पा, नुर्त्य, संगीत, खेळ अशा संमिश्र अदभुत सोहळ्यात ज्येष्ठांना दु:खाचा विसर पडून सुख अनुभवता आले.

'एक दिवस सुखाचा' जेष्ठ नागरिकांनी अनुभवला एक आगळा वेगळा कार्यक्रम

दरम्यान, महापौरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच घेण्यात आला. अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य काळे, अनिकेत काळे, सुमित हिवाळे, सचिन कुळे, अभिषेक काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वाघ यांनी केले.