आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी

आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी

काळेवाडी : आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. त्यावेळी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करत होळीची पुजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.

त्यावेळी मंडळाचे संस्थापक काळुराम नढे, अध्यक्ष अतुल नढे, उपाध्यक्ष खंडु आव्हाड, प्रमोद मोरे, शाम नढे, अनिल क्षिरसागर, बजरंग नढे, महादेव मुळीक, महेश डांगे, विशाल सपकाळ,, गणेश सोनवणे, विठोबा सपकाळ, प्रकाश रणवरे, युवराज नढे, रुद्रराज नढे, पृथ्वीराज नढे, प्रविण मोहिते यांच्यासह बालचमू चिन्मय, गोलु, परमवीर, यशश्री, वैष्णवी उपस्थित होते.

काळूराम नढे म्हणाले की, “हिंदू धर्मात पुर्वीपासून होळी सण साजरा केला जातो. मात्र, काळानुसार या सणात बदल होणे गरजेचे असून होळीनिमित्त प्रत्येकाने दुर्गुणांची, वाईट सवयी, व्यसने व भ्रष्टाचाराची होळी करणे आवश्यक आहे.”