डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड

डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड 

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत.

त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड