- काँग्रेसचे रवि नांगरे यांच्यातर्फे प्रभाग ३२ मध्ये करण्यात आले होते आयोजन
पिंपरी : काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रवि नांगरे यांच्या वतीने सर्व वयोगटासाठी रहाटणी येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा रहाटणीतील नागरिकांनी लाभ घेतला. त्यातील अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, विश्वजित जगताप, माऊली मलशेट्टी, विजय ओव्हाळ, रॉयल फाउंडेशनचे सल्लागार प्रकाश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, सल्लागार आनंद काटे, पंकज पाटोळे, आशा नांगरे, नंदिनी नांगरे, जया त्रिभुवन, नवनाथ कोकणे, प्रथम नांगरे, नरेंद्र नांगरे, मोहन वाघमारे, सुधाकर गायकवाड, सुरेखा माने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरास डॉ. निलेश चाकणे, डॉ. पुनित सिंग व डॉ. रजिया पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
रवि नांगरे म्हणाले की, अगोदरच्या नेत्र तपासणी शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. त्याच अनुषंगाने रहाटणी प्रभाग क्रमांक ३२ मधील नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराची मागणी केली. त्यानुसार या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्र तपासणी बरोबरच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत यावेळी डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
नांगरे पुढे म्हणाले की, “आरोग्य, शिक्षण, रोजगार व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर रॉयल फाउंडेशनचे निस्वार्थपणे काम सुरू असून पुढेही अविरतपणे चालू राहणार आहे. येणाऱ्या महापालीकेच्या निवडणूकीत मी प्रभाग क्रमांक ३२ मधून मागासवर्गीय प्रवर्गातून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहे. तरी नागरिक माझ्या सारख्या सुशिक्षीत उमेदवारास येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी देतील अशी आशा आहे. ”