काळेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लेखक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांनी आपल्या पुस्तकात वादग्रस्त लेखन केले. याचा निषेध करत कुबेर यांना संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी काळ फासले. या कामगिरीबद्दल सतिश काळे यांच्यासह श्रीमंगेश चव्हाण यांचा विजयनगरमधील वैभव कॉलनीतील रहिवाशांनी सत्कार केला.
त्यावेळी नितीन भोसले, अनिल हातणकर, विशाल हणमंते, विकी हणमंते, योगेश चव्हाण, निलेश चव्हाण, इरफान शेख, अखिल भारतीय मजदुर युनियनचे पुणे जिल्हाध्यक्ष सतिश खोपकर, प्रकाश ताम्हाणकर, वैभव भोसले, अविनाश सोनवणे, एस. एम. दळवी, मोसीन शेख, अर्जुन नेटके, निलेश चाले, प्रविण सोनवणे आदी उपस्थित होते.