पिंपरी : डांगे चौक थेरगाव येथे देशद्रोही कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्म भूषण पुरस्कार काढून घ्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या धरणे आंदोलन करण्यात आले.
राणावत यानी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे ती म्हणाली सन ‘1947’ ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या तिच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आली आहे. यावेळी तीने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कथित अपमानजनक वादग्रस्त वक्तव्य करून देशासाठी शहीद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे.
यामुळे कंगना राणावत विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणांहून तक्रार दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या वक्तव्यानं कंगणानं स्वातंत्र्यसेैनिकांसोबतच स्वातंत्र्यलढ्याचाही अपमान केल्यामुळे तिचा पद्म पुरस्कार काढून तत्काळ घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
या आंदोलनात अनेक मान्यवरांनी अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन कंगना राणावत हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यामध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे नेते सुरेश गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे संघटक संजय जाधव, प्रा.नरेंद्र पवार यांनी अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे संघटक नकूल भोईर, सतिश कदम, भैय्यासाहेब गजधने, विनोद घोडके, महेश कांबळे, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, विक्रम गुंड, बाळासाहेब माने, संभाजी मालपोटे बसपाने राजेंद्र पवार, संतोष बादाडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.