माजी उपमहापौर विष्णू कांबळे यांचे निधन

माजी उपमहापौर विष्णू कांबळे यांचे निधन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर विष्णू गुलाब कांबळे वय (७८) यांचे शुक्रवारी ( ता. 24) दुपारी पदीर्घ आजाराने निधन झाले. सोलापुर जिल्ह्यातील चौबे पिंपरी हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचा जन्म १९४३ साली सोलापुर येथे झाला होता. नोकरीनिमित्त ते पिंपरी चिचंवड शहरात आले. त्यांनी एस के एफ कंपनीमध्ये नोकरी केली.

१९८६ ते ९२ या काळात नगरसेवक पदावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य, अध्यक्ष गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे, स्थायी समिती सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले.

त्यांच्या कार्यकाळात चिचंवड येथे प्रेक्षाग्रह उभारण्यात आले तेच आजचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रह आहे. ते शिवशंकर सेवाभावी चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक व विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचे संस्थापक होते.

त्यांच्या मागे पत्नी दोन मुले तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे व एन.एस. यु. आय (विद्यार्थी काँग्रेस) चे माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज कांबळे यांचे ते वडील होत.