काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

पिंपरी : काळेवाडी (Kalewadi) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये चार मोती बिंदूचे रूग्ण सापडले असून त्यांची लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच यावेळी चष्मेही वाटप करण्यात आले. अशी माहिती शिबिराचे संयोजक शेख इरफान अब्दुल रहीम यांनी दिली.

डॉ. निलेश चाकणे (Dr Nilesh Chakane), डॉ. पुनित सिंग (Dr. Punit K Singh), रजिया पठाण यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, हज्रात पटेल, शकील शेख, साजिद शेख, हाजीमलंग शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर, श्रीकांत पारखी, शरद राणे, रवी राहते, राजू राहते, अनिल कदम, सुधाकर नलावडे, आशिफ शेख, इकबाल पठाण, अहमद मोमीन, चंद्रजिरी, राजीव पिल्लई, दीपक चव्हाण, मदन पुरोहित, अनिल हातणकर, प्रकाश ताम्हणकर आदी उपस्थित होते.

काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

याबाबत इरफान शेख म्हणाले की, एकूण १०१ लोकांनी सहभाग घेतला. त्यापैकी ८१ लोकांचे परीक्षण केले गेले. सर्वांना योग्य वेळ देण्यात आली, वेळ अभावी राहिलेले लोकांना दुसऱ्या शिबिरात वेळ दिला जाणार आहे. लवकरच पुढील मोफत शिबिर काळेवाडीत आयोजित केला जाणार असून त्यासाठी नागरिकांनी 9765615017 या क्रमांकावर पुर्व नोंदणी करावी.