हरगुडे वस्तीमधील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरगुडे वस्तीमधील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सारीका राजेश हरगुडे यांच्यावतीने हरगुडे वस्ती चिखली येथे मोफत आरोग्य तपासणी व प्राथमिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन हरगुडे वस्ती येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि यांनी केले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये रक्तदाब, सुगर, मधुमेह इत्यादी तपासणी आणि मोफत औषध उपचार करण्यात आले. या शिबिराचा हरगुडे वस्ती, घरकुल, कुदळवाडी, राजे शिवाजी नगर येथील असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या शिबिरास शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सारिका हरगुडे यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, पंकज भालेकर, राजेश हरगुडे, माजी शिक्षण सभापती विजय लोखंडे, दत्तात्रय जगताप, गणेश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.