राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सुनील कुसाळकर यांचा पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सुनील कुसाळकर यांचा पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : तूर्तास लांबणीवर पडलेल्या परंतु, अचानक कधीही होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. त्याच अनुषंगाने जाधववाडी चिखली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे युवा कार्यकर्ते आणि सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सुनील कुसाळकर यांनी पक्ष कार्यालयात प्रभाग क्रमांक तीनमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सुनील कुसाळकर हे आपल्या खास शैलीमध्ये सामाजिक कार्य आणि युवक वर्गामध्ये फेमस आहेत. त्यांना युवकांचा खूप मोठा पाठिंबा आहे. आणि म्हणून अशा धाडसी आणि डॅशिंग नेतृत्वाला महानगरपालिके मध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. आणि त्याच उद्देशाने सुनील कुसाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयामध्ये दाखल केला आहे.

याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, कविता खराडे, अनंत सुपेकर, संदीप कुसाळकर, विनोद इंगळे, महावीर समुंदर, संतोष इंगळे, विशाल पवार, किशोर चव्हाण, आर्यन मुळे आदी उपस्थित होते.