संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे

संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे
  • कर्नाटक सरकार विरुध्द राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार : सायली नढे

पिंपरी, ता १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे. कॉंग्रेस हा संविधानाचा आदर करणारा पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाने, संघटनेने वा इतर धर्मियांनी हस्तक्षेप करु नये. कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरण्यास आक्षेप घेतला आहे. याचा शहर महिला कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, वैशाली गायकवाड, आशा भोसले, रचना गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, प्रियांका कदम, रुक्साना सैफी, रिजवाना मोमीन, आबिदा शेख, भारती घाग, शितल सिकंदर, सुप्रिया पोहरे, शमा परविन शेख, रुकय्या बानू, अबेदा खान, जफिरा शेख, मुन्बी शेख, अजमती शेख, अंजुम शेख, नजिबा शेख, शकीला सय्यद, शहनाज सय्यद, आफ्रीन शेख, आसिम कुरेशी, गजला शेख आदी उपस्थित होते.

यावेळी सायली नढे पुढे म्हणाल्या की, कर्नाटक सरकारच्या या दादागिरी विरुध्द राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवणार आहोत. याविषयावर यापुर्वी देखिल केरळ उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. देशात सध्या उत्तर प्रदेश, गोवा व इतर राज्यात विधानसभा निवडणूका सुरु असून त्या पार्श्वभुमीवर कर्नाटक सरकारने हिजाब विरुध्द आदेश काढून देशभर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे असेही सायली नढे म्हणाल्या. यावेळी कर्नाटक सरकारच्या व भाजप विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Actions

Selected media actions