रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते किरण लोंढे, बाळासाहेब शेंडगे, राहुल गायकवाड, सुमन झेंडे, सुरेश पठाडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर अरुण चाबुकस्वार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कळसाईत यांनी केले व सिल्व्हनिया जाधव यांनी आभार मानले.