वर्दीतील हिरो : पायाला दुखापत असतानाही या पोलिसाने केले हे काम (व्हिडीओ)

मुंबई : दिवस पाळी कर्तव्य करून घरी जाताना इंदिरानगर येथे चाळीमध्ये घुसलेल्या धामण जातीच्या सर्पला पोलिसाने सुरक्षित पकडून त्यास वनविभागाकडे दिले. विशेष म्हणजे त्यावेळी त्या पोलिसाच्या पायाला दुखापत होती. या पोलिसाने केलेल्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुरलीधर श्रावण जाधव असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कुर्ला पोलिस स्टेशन येथे कार्यरत अाहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर जाधव हे (ता. २४ मार्च) दिवस पाळी कर्तव्य करून घरी जात होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, इंदिरानगर, जुहू तारा रोड, सांताक्रुज पश्चिम मुंबई येथे चाळीमध्ये साप घुसला आहे. आपल्या पायाला दुखापत असल्याची तमा न बाळगता जाधव यांनी त्या ठिकाणी धाव घेतली, आणि त्या पाच ते सहा फुट धामण (Indian Rat Snake) जातीच्या सापाला सुरक्षित पकडून त्यास वनविभागाकडे सुपूर्त केले.

Actions

Selected media actions