
मावळ (लोकमराठी) : वडगाव मावळ येथील चंद्रभागा हॉमिओपॅथिक क्लिनिक, काटे असोसिएट्स, ऍडव्होकेट यांच्या वतीने वडगाव न्यायालयातील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी यांना हॉमिओपॅथीक प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या संसर्गजन्य कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वडगाव न्यायालयातील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी आपले कर्तव्य निस्वार्थीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्याप्रती निष्ठा ठेवून त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून व आपले बांधव निरोगी राहून त्यांची सेवा अखंड सुरू रहावी तसेच त्यांचे कुटुंब देखील निरोगी रहावे यासाठी चंद्रभागा होमिओपॅथीक क्लिनिक, काटे असोसिएट व ऍडव्होकेट्स यांच्या वतीने ७२ न्यायालयीन कर्मचारी व दोनशे पोलिस कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले. डॉ. अक्षय तुकाराम काटे, ऍड. धनंजय काटे व ऍड. चेतन कदम उपस्थित होते.
- महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत खून
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती