
आकुर्डी : पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आकुर्डी गावातील पांढरकर वस्ती येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. माजी नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर व आकुर्डी गावचे ज्येष्ठ नागरिक बाजीराव काळभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढरकर, भास्कर नारखडे, राहुल जाधव, अॅड. बाबुलाल वाघमारे, अॅड. राजेंद्र काळभोर, क्षीरसागर, शरद जगताप, लजपत प्रजापती, अशोकराव पांढरकर, सारिका जाधव, सोनाली वाल्हेकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, केतकी डेडसेना, पार्वती बुरुड, मनीषा चौधरी, सलोनी शर्मा, स्नेहल घनवट यांच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक निलेश पांढरकर म्हणाले की, आज आपण आपल्या भारत देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या प्रवासाकडे वळून पाहतो तेव्हा आपले हृदय अभिमानाने आणि सन्मानाने भरून येते. कारण, एकता आणि सद्भावनेचा विचार सोबत घेऊन सर्व जातीत धर्माचे बांधव एकत्र रहात आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे एक अब्ज ३० कोटी पेक्षा जास्त आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही भारत देशामध्ये चैतन्यशील आणि एकसंघ एकजूट आहे, देशात एकता आहे. त्यामुळे संपूर्ण विश्व आज भारत देशाकडे आदराने पहात आहे. भारतातील लोकांनी वेळोवेळी आपल्यातील एकता आणि सद्भावना दाखवून भारत देशाला महान व महासत्ता बनवले आहे. गेले दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळातही प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी करण्यासाठी आणि संकटातून देशाला वाचवण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी मतभेद धर्म, जात बाजूल ठेवून आपापल्या परीने देशाची सेवा केली आणि आज आपण या मोठ्या संकटावर मात केली आहे.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे
पांढरकर पुढे म्हणाले की, “कोरोना सारख्या मोठ्या संकटातून भारत देशाला सावरण्यासाठी त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व भारतीय नी एक विचाराने एकजुटीने सर्वांनी धैर्याने काम केले आहे. आज भारत देश एका सुरक्षित ठिकाणी उभा आहे. भारत देश आता एक स्वतंत्र व लोकशाही असलेले राष्ट्र आहे. भारतीय राज्यघटनेच्या संविधानाने प्रस्तावनेत देशाचा एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही असलेले राष्ट्र असा उल्लेख आहे. आपल्या देशातील सर्व मुलांना देशाच्या महानतेची ओळख पटवून देणे आपली जबाबदारी आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला आणि आपला सन्मान कसा मिळवला हे त्यांच्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने थोर विचारवंत स्वातंत्र्य सैनिक यांनी ज्यांनी जीवाचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या शूरांना आणि शहीदांना शत शत प्रणाम.”
यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लिंगायत व हर्षवर्धन पांढरकर यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.