भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे

भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही - राज ठाकरे

पुणे : “भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही,” असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले.

“भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही.” असे राज ठाकरे एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी अमित शाह यांनी केलेल्या प्रयत्नासाठी त्यांचं अभिनंदन करतो.

आपल्या देशाला अजून माणसांची गरज आहे का? सध्या निघणाऱ्या मोर्चांमध्ये स्थानिक नागरिक किती आहेत हे पाहाण्याची गरजही आहे. जे सध्या भारतात राहात आहेत त्यांची सोय झालेली नाही. बाहेरून लोक घेण्याची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. जे इथं पिढ्यानपिढ्या राहात आहेत. त्यांना असुरक्षित वाटण्याची गरज काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी मांडला.

“नागरिकत्व सुधारणा कायद्यात गोंधळ आहे. त्याच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या कायद्याबद्दल आपली मतं मांडली. खरी गोष्ट लोकांसमोर कोणीही आणत नाहीये, केवळ तर्कावर सुरू आहे. ते होऊ नये याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी होती,” जर आधार कार्डामुळे राष्ट्रीयत्व सिद्ध होत नसेल तर लोकांना रांगेत कशाला उभं केलं असंही राज ठाकरे म्हणाले.