भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष – कॅप्टन संतोष कोकणे

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष - कॅप्टन संतोष कोकणे

रहाटणी : ७१ वर्षापूर्वी साधी टाचणी बनवण्यास पात्र नसलेला देश आज चंद्रमोहीम, मंगळमोहीमद्वारे आकाशाला गवसणी घालत आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशानेच बनवली असल्यामुळे आपल्या देशाचे जगात नावलौकिक झाले आहे. १९५० ला लावलेले इवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष ठरत आहे” असे प्रतिपादन कॅप्टन संतोष कोकणे यांनी येथे केले.

येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन संतोष कोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या निमित्ताने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व लेझीमचे आयोजन करण्यात आले होते तसेच परेड करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, संत तुकाराम महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक विष्णू तांबे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कारभारी, तात्या शिनगारे, लायन्स क्लबचे सेक्रेटरी अंजुम सय्यद,इंदू सूर्यवंशी, अनिता कांबळे, दीपक नागरगोजे, भिकोबा तांबे स्कूलचे मुख्याध्यापक विजय सर्जे, युवराज प्रगणे मनपाचे कनिष्ठ अभियंता संदीप चाबूकस्वार, संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

वैशाली काळे व उत्कर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिन कळसाईत यांनी आभार व्यक्त केले.