सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार

सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, दि. ४ डिसेंबर २०२२ : राज्यभरात अनेक तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, पण राज्य सरकारने पोलिस भरतीत आवश्यक कोणतेही बदल न केल्याने त्याना अर्ज दाखल करता आलेला नाही. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तृतीयपंथीयांचा स्वतंत्र सेल स्थापन करत संघटन केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेसने क्रांतीकारक पाऊल उचल तृतीयपंथी समाजातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामावून घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून न घेतल्यास राष्ट्रवादी काॅग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल.

समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी यांना दररोज संघर्ष करावा लागतोय. त्यातच सरकार देखील त्यांची परीक्षा बघू लागले आहे. तृतीयपंथीयांना पोलिस भरतीत सामावून घेण्याच्या अर्जात अद्याप कोणताही बदल गृह विभागाने केलेला नाही. महाराष्ट्र प्रशासकीय आयोगाने (मॅट) राज्य सरकारला दिलेली मुदत आज (४ डिसेंबर) संपत असून आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. राज्य सरकार तृतीयपंथीयांवर अन्याय करत असून सरकारविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत असेही यावेळी गव्हाणे यांनी सांगितले.

राज्य सरकारने पोलिस भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पुरुष व महिलांची सुमारे अठरा हजार पदे भरली जाणार आहेत. पोलिस भरती प्रक्रियेसाठी (४ डिसेंबर) पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिलेली आहे. मात्र, पोलिस भरती प्रक्रिया जाहीर केल्यापासून तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक यांच्याकडे वारंवार मागणी निकिता मुख्यदल आणि त्यांच्या अन्य सहका-यांनी केली आहे. परंतू, मुख्यमंत्री यांनी आश्वासन देण्यापलिकडे काहीच केले नाही.

सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शहर प्रवक्ते विनायक रणसूभे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, तृतीयपंथी सेल अध्यक्ष किरण वाघ, महीला कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, तृतीयपंथी पदाधिकारी निकिता मुख्यदल, रूपा लोटलीकर, प्रेम लोटलीकर, कादंबरी, फिरोज मुजावर, विना काळे, रामकिसन आरे, कीर्ती शिंदे, मयूर काळभोर, साक्षी मस्के, सुरज डोकेफोडे इत्यादी परी पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.