माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांना मातृशोक

माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांना मातृशोक 

काळेवाडी, ता. १ सप्टेंबर : येथील माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांच्या मातोश्री रंजना जयवंत नढे (वय ५६) यांचे आज (ता. १ सप्टेंबर) पहाटे निधन झाले. काळेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

दिवंगत रंजना नढे या गेली काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नढे कुटुंब व काळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून त्यांनी संसार उभा करत आदर्श कुटुंब बनविले होते.

राजकारण, समाजकारण, संप्रदाय आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना योग्य ते संस्कार दिले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.