शहरामध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त झाले की काय – कविता अल्हाट यांचा सवाल

शहरामध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त झाले की काय - कविता अल्हाट यांचा सवाल

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : अगदी काही थोड्याच दिवसांमध्ये होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात प्रभाग संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. आज प्रभाग क्रं १२ मध्ये बैठक आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना कविता अल्हाट म्हटल्या की, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने असं एकही क्षेत्र सोडलं नाही की, ज्यामध्ये भ्रष्टाचार केला नाही. कुत्र्याच्या नसबंदीमध्ये सुद्धा यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसाला ५७ कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे रेकॉर्ड नोंद आहे. त्यामुळे शहरात माणसं कमी आणि कुत्रे जास्त झाले की काय, असा सवाल कविता अल्लाट यांनी उपस्थित केला.

त्यावेळी आयोजक दत्तात्रेय जगताप, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, धनंजय भालेकर, प्रवीण भालेकर, मसुळकर, संगीता आहेर, काशिनाथ जगताप, गणेश साने, अशोक मगर, प्रभागातील नागरीक उपस्थित होते.