पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत गोंधळ

पिंपरी : नागरिकांना न कळवता महापालिकेच्या वतीने सोमवारी (दि. २८ मार्च) अचानक जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती. एका छोट्याशा कक्षात एका एकाला बोलवुन लेखी तक्रार घेत होते.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे, सोमनाथ तापकीर, गोरख पाटील, कैलास सानप, मधुकर बच्चे त्याठिकाणी दाखल झाले. संवादसभा ही सभागृहातच घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. परंतू, प्रशासन त्याला तयार नव्हते, म्हणुन या सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज फाडुन टाकून कागदाचे तुकडे संबंधीत अधिकाऱ्याच्या अंगावर टाकून निषेध केला.

त्यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, जाणीव फाऊंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, विभाग संघटक अंकुश कोळेकर, गणेश वायभट, उपविभाग प्रमुख अनिल पालांडे, शाखाप्रमुख नरसिंग माने, विकास काजवे, अरुण हुमनाबाद आदी उपस्थित होते.