महाराष्ट्र अंनिस करते शोषण मुक्तीचे काम : प्रधानसचिव संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र अंनिस करते शोषण मुक्तीचे काम : प्रधानसचिव संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

पिंपरी : देव, धर्म, श्रद्धा यांच्या नावाखाली लोकांची जी फसवणूक होते, शोषण होते, ते थांबविण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी केले.

महाराष्ट्र अंनिसच्या आकुर्डी पुणे शाखेने चिंचवड येथील अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र येथे कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या कामाची पंचसूत्री याविषयावर संजय बनसोडे यांनी मांडणी केली. खगोलशास्त्र आणि विज्ञान या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे यांनी मांडणी केली.

जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर महाराष्ट्र अंनिसच्या विधी व्यवस्थापन विभागाच्या कार्यवाह अँड. मनीषा महाजन यांनी मांडणी केली. महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे वमहाराष्ट्र अंनिस आकुर्डी शाखेच्या कार्याध्यक्ष क्रांती दांडेकर यांनी चमत्कार सादरीकरण केले. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी सुनील चोरडिया, महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय बारी, महाराष्ट्र अंनिस आकुर्डी पुणे शाखा सचिव स्वप्नील वाळुंज, महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा निधी व्यवस्थापन विभागाचे कार्यवाह एकनाथ पाठक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र अंनिसने शोषणाला विरोध करून लोकांना समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. महाराष्ट्र अंनिसही संत सुधारकांच्या पायावर उभी असून तो वारसा महाराष्ट्र अंनिस चालवत आहे, असेही संजय बनसोडे म्हणाले. ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. त्यामुळे लोकांनी ज्योतिषांच्या नादी लागू नये, असे डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गंगाधर सत्वधर, विकास सूर्यवंशी, संजय बनसोडे, बाळासाहेब घस्ते, विशाल विमल, रविराज थोरात, श्रावणी वाळुंज, राजकुमार माळी, नितीन खलाने, डॉ. योगेश गाडेकर, सुनील चोरडिया व हँडीकॅप सेंटर पुणे यांची टीम यांनी सहकार्य केले.